"सद्गुरू श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचं चरित्र म्हणजे प्रापंचिक साधकानं कसं असावं आणि नामात राहून समाधान कसं मिळवावं याचा विश्वकोश. या गोष्टी ऐकून आपण जर खरंच नामाला लागलो आणि आयुष्यात समाधान आलं तर ते महाराजांना आवडेल."
Thursday, August 31, 2017
Thursday, August 24, 2017
Saturday, August 19, 2017
Friday, August 18, 2017
Thursday, August 17, 2017
Wednesday, August 16, 2017
Tuesday, August 15, 2017
Sunday, August 13, 2017
Saturday, August 12, 2017
Thursday, August 10, 2017
नामालय उपक्रमासंबंधी माहिती
श्रीराम!
🙏

श्रीमहाराजांच्या गोष्टी नियमित ऐकणाऱ्या सर्वांसाठी ही सूचना. ७० गोष्टींनंतर आपण विश्रांती घेतो आहोत हे खरं असलं तरी नामाच्या प्रवासाला विराम नाहीच. या गोष्टींमधून जी गोष्ट मुख्यत्वाने साधायची, ती कोणत्याही आलंबाशिवाय साधता यावी हाच यामागचा हेतू आहे. त्यामुळे सध्या अजून १० गोष्टींनंतर आपण विश्रांती घेत असलो, तरी ज्या ज्या लोकांनी या उपक्रमाला भरभरून प्रतिसाद दिला, त्यांनी या नामाच्या प्रवासात देखील अशीच साथ एकमेकांना द्यावी यासाठी "नामालय" या उपक्रम गेल्या २ वर्षांपासून चालू आहे. यात देश विदेशातील अनेक साधक सहभागी आहेत. या उपक्रमातून आपण सर्व एका नामाच्या धाग्यात बांधलेले राहू. ज्यांना या उपक्रमात सहभागी होऊन श्रीमहाराजांनी सांगितलेल्या नामसाधनेत मनापासून सहभागी व्हायची इच्छा आहे, त्यांनी खालीलपैकी एका whatsapp क्रमांकावर संपर्क साधावा - 8904853770 / 9881400280
रोज श्रीमहाराजांच्या गोष्टी ऐकणाऱ्या जितक्या लोकांपर्यंत हा मेसेज पोहोचवणे शक्य असेल तितक्या लोकांपर्यंत पोहोचवावा ही नम्र विनंती!
!!! नामालय उपक्रमासंबंधी माहिती !!!
श्रीराम! दोन वर्षांपुर्वी नारद जयंतीच्या दिवशी सुरू झाला होता. या उपक्रमाचे नाव "नामालय" असे आहे.
रामरायाच्या इच्छेने आणि सद्गुरु कृपेनें ५ मे २०१५ रोजी "नामालय" या नामसाधना उपक्रमाला सुरूवात झाली. आजपर्यंत या उपक्रमात ३५० हून अधिक भारतातील तसेच परदेशातील साधक अतिशय आणि मनोभावे नामस्मरण करत आहेत व नियमितपणे ग्रुपमध्ये त्याची नोंदणी करत आहेत. या साधकांचा वैयक्तिक परिचय नसतांना केवळ नामाच्या धाग्याने सर्वजण जोडले गेले आहेत.
या सर्वांचा गेल्या सव्वा दोन वर्षांतील जपसंख्या ७१ कोटी एवढी झालेली आहे.
नामालय मध्ये सहभागी होण्यासाठी दररोज किमान एक तास नामस्मरण व्हावें अशी अपेक्षा आहे. नामालय या WhatsApp ग्रुपमध्ये कोणत्याही पोस्ट किंवा फोटो इ मुळीच टाकले जात नाहीत. मात्र सर्व साधक दर रविवारी आपली वैयक्तिक आठवड्याची एकत्रित जपसंख्या नामालय मध्ये नोंदवतात.
प्रत्येकाच्या साधनेला जोर यावा आणि आत्मकल्याणाच्या दिशेनं एक पाऊल पुढे पडावं, असा 'नामालय'चा मानस आहे. रामरायाच्या कृपेने श्रीमहाराजांच्या सत्तेनेे या नामसाधनेचा आज वटवृक्ष बनला आहे!
या उपक्रमांत सहभागी झालेल्या प्रत्येक साधकानें दररोज किमान ६० मिनीटे मनांत नामजप करावा. त्यासाठी माळेचें बंधन नसेल. स्वयंपाक, घरकाम, प्रवास, व्यवसाय इ. चालू असतांना मुखांत नाम असावें. हाताने काम आणि मुखानें नाम असे करता येईल.
त्यासाठी, अगोदर १० मिनिटांत माळेवर किती नामजप होतो हे पाहून त्याप्रमाणें घड्याळीवरची जपसंख्या त्यापेक्षा थोडी कमी गृहीत धरावी. उदा. १० मिनिटांत माळेवर ४०० नामजप होत असेल तर घड्याळीवरचा जप ३०० धरावा. कालांतराने त्यांत गती येऊन वाढ होईल. परंतु, दररोज किमान ६० मिनिटे नामजप होईल असा प्रयत्न करावा. जास्त झाल्यास आनंद आहे.
सलग ६० मिनीटे नाही झाला तरी थोडा थोडा वेळ व नंतर वेळेच्या गणितानुसार त्याची बेरिज करून दिवसाची एकूण नामजपसंख्या रात्री सद्गुरूंना वंदन करून त्यांना सांगावी आणि एखाद्या वहीत नोंद ठेवावी. दर रविवारी आपली आठवडाभरची एकूण नामजप संख्या नामालय मध्ये कळवावी.
साधकांचा जप नामालय कुठेही दान करत नाही; प्रत्येकाचा जप त्याच्याकडेच राहतो. या नामालयात जपसंख्या केवळ प्रत्येकाचे नामस्मरण वाढावे, यासाठी कळवली जाते. अधिकाधिक साधकांनी सहभागी होऊन नामाला लागावें, ज्यामुळें आपल्याला नामांत राहून कर्तव्य कर्म करण्याची सवय लागून तो आपला सहजधर्म बनेल. हाच सद्हेतू आहे. या नाम साधनाच्या अलौकिक कलेसाठी आपण मनापासून प्रयत्न करावा, बाकी रामराया सांभाळून घेईल!
🙏
Wednesday, August 9, 2017
Tuesday, August 8, 2017
Monday, August 7, 2017
Saturday, August 5, 2017
Friday, August 4, 2017
Thursday, August 3, 2017
Wednesday, August 2, 2017
Subscribe to:
Posts (Atom)
महत्त्वाची सूचना --
जय श्रीराम 🙏 १४८ नंतरच्या सर्व श्रीमहाराजांच्या गोष्टी YouTube चॅनेल वर प्रसारित होतील याची कृपया नोंद घ्यावी -- YouTube Channel Link - ht...
-
जय श्रीराम 🙏 १४८ नंतरच्या सर्व श्रीमहाराजांच्या गोष्टी YouTube चॅनेल वर प्रसारित होतील याची कृपया नोंद घ्यावी -- YouTube Channel Link - ht...